खड्डेमय रस्त्यांचे व्हिडिओ पोस्ट करून स्वतःचाच अपयशी कारभार जनतेसमोर मांडत रहावा
१० वर्षांतील अपयशी आणि टक्केवारी कारभारामुळेच मालवण कुडाळ मधील अनेक रस्ते नादुरुस्त
मात्र आमदार निलेश राणे जनसेवेसाठी आणि मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध
कोट्यावधी निधीतील विकास कामे व विकास निधीची आकडेवारीच जनतेसमोर
शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे, शहरप्रमुख तथा उपनगराध्यक्ष दिपक पाटकर यांनी विरोधकांना सुनावले
आम्ही रील केले तर महागात पडेल ; उपनगराध्यक्ष दिपक पाटकर यांचा विरोधकांना इशारा
मालवण | प्रतिनिधी : स्वतः दहा वर्षे आमदार असताना काहीच करू शकले नाहीत. मात्र जनतेने घरी बसवल्यामुळे मालवण तालुक्यातील रस्ते नादुरुस्त झाल्याचा व्हिडिओ रील पोस्ट करत माजी आमदार वैभव नाईक व त्यांचे कार्यकर्ते स्वतःचीच पोलखोल करत आहेत. वरचा मजला रिकामा असल्यामुळे त्यांना कळत नाही की हे रस्ते स्वतःच्या व माजी खासदार विनायक राऊत यांच्या कार्यकाळातील आहेत. दोघेही निष्क्रिय म्हणून आता घरी बसले आहेत आणि आपलें अपयश जनतेला दाखवत व्हिडिओ पोस्ट करण्याचे काम करत आहेत. राऊत जनतेला छळतात, तर नाईक जनतेला फसवतात, अशी या दोघांची स्थिती आहे. माजी आमदार वैभव नाईक यांनी घरी बसून रीलच करावेत. मात्र आम्ही रील केले तर महागात पडेल. असा सूचक इशारा देत शिवसेना मालवण तालुकाप्रमुख मंदार लुडबे, शहरप्रमुख तथा उपनगराध्यक्ष दिपक पाटकर यांनी विरोधकांवर सडकून टीका केली.
दरम्यान, आमचे आमदार निलेश राणे तसेच खासदार नारायण राणे साहेब, पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून सातत्याने कोट्यावधी निधी मालवण तालुक्यात प्राप्त होतं आहे. आताही जिल्हा नियोजन मधून मालवण शहर व तालुक्याला मोठा निधी प्राप्त झाला आहे. पोटशूळ आलेल्या विरोधकांनी फक्त विकासाचे आकडे मोजत राहावे. आता त्यांना तेच काम आहे. असा टोला मंदार लुडबे, दिपक पाटकर यांनी लगावला.
आमदार निलेश राणे जनसंपर्क कार्यालय येथे शिवसेना मालवण तालुकाप्रमुख मंदार लुडबे, शहरप्रमुख तथा उपनगराध्यक्ष दिपक पाटकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर, शिवाजी केळूसकर, गणेश परब उपस्थित होते.
लुडबे, पाटकर पुढे म्हणाले, आमदार निलेश राणे साहेबांचा आमदारकीचा कार्यकाळ दोन वर्षे पण पुर्ण झाला नाही. मात्र यां काळात आमदार निलेश राणे साहेबांनी माजी आमदारांना 10 वर्षात जमला नाही त्यापेक्षा जास्त निधी आणला. बंधारे उभारणी किनारा सुरक्षिततायासाठी शेकडो कोटीचा निधी. ओरोस-कसाल मालवण आशियायि डेव्हलपमेंट बँक ADB कडून 7 मीटर आणि 35 किलोमीट रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी 306 कोटींचा निधी मंजूर.
विकासाची आकडेवारी मोठी आहे. प्रातिनिधिक स्वरूपात सांगायचे तर आताचीच आकडेवारी पाहता राज्य अर्थसंकल्पातून ६ कोटी रुपये प्राप्त केले आहेत. रस्ते बजेटमधून दुरुस्तीसाठी २० कोटी मंजूर आहेत, ज्यामध्ये दोन राज्यमार्ग आणि ७ जिल्हा मार्गांना मंजुरी दिली आहे. कामे सुरू होण्याच्या मार्गावर आहेत. २५/१५ अंतर्गत मालवण-कुडाळसाठी अजून ४ कोटींचे प्रस्ताव आहेत. ६.१९ कोटी रुपयांची कामे गावपातळीवर पूर्ण झाली आहेत व किरकोळ कामे प्रगतीपथावर आहेत. म्हणजेच आमदार साहेबांनी राज्य सरकारकडून साधारण ३१ कोटी पेक्षा जास्त निधी आणला. जिल्हा नियोजनातून २५/२६ मध्ये एकूण ३२ कोटी ४५ लाख रुपये आणले असून हा विकासनिधी जवळपास खर्च झालेला आहे.जिल्हा नियोजनातून २६/२७ मध्ये पहिल्या टप्प्यात १५ कोटी प्राप्त झाले आहेत, त्यांची कामे दिवाळीनंतर सुरू होतील. मागील माजी आमदार नाईक यांचनी अपयशी कार्यकाळात काहीच न केल्यामुळे जे रस्ते नादुरुस्त आहेत ते जनतेच्या हिताच्या पुर्ण करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरु आहे. पावसाळी कालावधी असल्यामुळे काही वेळ लागेल मात्र आमदार निलेश राणे हे रस्ते १००% दुरुस्त करणार हा जनतेचा विश्वास आहे. मालवणमध्ये मुख्य रस्ते आणि राज्यमार्ग ६१ कि.मी., तसेच १४१ कि.मी. चे प्रमुख जिल्हा मार्ग, एकूण ४८ कि.मी. लांबीचे रस्ते आहेत. यांवर लवकरच दुरुस्ती होणार आहे; कारण १० वर्षे नाईक आणि राऊत अपयशी ठरले, म्हणूनच राणे साहेबांच्या हातात हा मतदारसंघ जनतेने विश्वासाने दिला आहे. त्या विश्वासाला पात्र राहून आमदार निलेश राणे गतिमान पद्धतीने कामे पूर्ण करत आहेत. येत्या वर्षभरात मालवणचे रस्ते व्यवस्थित होणार, त्यासाठी राणे साहेब आणि शिवसेना महायुती कार्यरत आहे. यासोबतच अनेक विकास प्रकल्प जनहिताची अनेक कामे होत आहेत.
सर्वसामान्य जनता शेतकरी मच्छिमार कष्टकरी व्यापारी पर्यटन व्यवसायिक कलावंत विद्यार्थी महिला भगिनी ज्येष्ठ या सर्वांनाच न्याय देण्याचे काम आमदार निलेश राणे करत आहेत म्हणूनच जनता ठामपणे त्यांच्या पाठीशी उभी आहे. याचाच पोटशुळ उठत असल्यामुळे विरोधकांकडून नाहक टीका करण्याचा प्रयत्न सुरू आहे मात्र त्यातून या विरोधकांच्याच अपयशी कारभाराचे चित्र स्पष्ट होते. असा घणाघात मंदार लुडबे, दिपक पाटकर यांनी केला.
आम्ही रील केले तर महागात पडेल : उपनगराध्यक्ष दिपक पाटकर
स्वतःच्या आमदार काळात काहीच न केलेले माजी आमदार वैभव नाईक आता रील, व्हिडिओ करून रस्त्यांवरील खड्डे दाखवत आहेत. मात्र हा कारभार त्यांच्याच अपयशाचा आहे. अहो आता तरी सुधारा अन्यथा आम्ही रील केले तर महागात पडेल असा सूचक इशारा शिवसेना मालवण शहरप्रमुख तथा उपनगराध्यक्ष दिपक पाटकर यांनी दिला आहे.











