चिपळूण (वार्ताहर) : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)चे अध्यक्ष, केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे मोदी सरकारमध्ये सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री झाल्यानंतर ३ सप्टेंबर रोजी प्रथमच चिपळूण दौऱ्यावर येत आहेत.
रविवारी दुपारी १२.३० वाजता हॉटेल अभिरुची चिपळूण येथे रामदास आठवले हे येणार आहेत. त्यानंतर ते यशोधन नगर येथील दिवंगत अॅड.दयानंद फाउंडेशन स्मारकाची पाहणी करतील. दुपारी १ वाजता स्वर्गीय लक्ष्मीबाई बाळासाहेब माटे सभागृह कापसाळ येथे कार्यकर्ता मेळावा होणार आहे. दुपारी ३.१५ वाजता शासकीय विश्रामगृह येथे समाज कल्याण अधिकारी यांच्यासमवेत बैठक होईल. यानंतर ॲड.दयानंद फाउंडेशन यांच्यावतीने ना. रामदास आठवले यांच्या हस्ते अपंग गरजू रुग्णांना व्हीलचेअर वाटप करण्यात येणार आहे. सायंकाळी ४.१५ वाजता पत्रकार परिषद होणार आहे. तर सायंकाळी ६.२० वाजता आठवले मुंबईकडे रवाना होतील.
फोटो फाईल- सीपीएन२-३










