सांगुळवाडी सरपंचपदी भाजपच्या पुजा रावराणे यांची बिनविरोध निवड

वैभववाडी | प्रतिनिधी : सांगुळवाडी गावच्या सरपंचपदी भाजपच्या पूजा रावराणे यांची बिनविरोध निवड जाहीर झाली आहे. सरपंच पदाची निवडणूक ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी पार पडली. सौ. रावराणे यांच्या निवडीनंतर गावात त्यांचे अभिनंदन केले जात आहे. यावेळी उद्योजक विकास काटे, भाजपा पदाधिकारी प्रकाश पाटील, माजी सरपंच गौरी रावराणे, ग्रामपंचायत सदस्य राहूल जाधव, बाळाजी रावराणे, सत्यवान सुतार, स्नेहल भोवड, वंदना लाड, प्रवीण रावराणे, सत्यवान पाटील, संजय विश्वासराव, संजय रावराणे, अरूण रावराणे, अक्षय पाटील, कल्पेश रावराणे, ओमप्रकाश भोवड, ग्रामसेवक विद्याधर सावंत व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.