पाटपन्हाळे विद्यालयात “चला जाणुया नदीला “अभियानांतर्गत उपक्रम संपन्न

Google search engine
Google search engine

पाटपन्हाळे (वार्ताहर ) भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत “चला जाणुया नदीला ” या अभियानांतर्गत गुहागर तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे या विद्यालयात शालेय स्तरीय प्रभात (जनजागृती )फेरी , निबंध स्पर्धा ,वकतृत्व स्पर्धा व चित्रकला स्पर्धा हे उपक्रम इयत्ता १ली ते ५वी गट , इयत्ता ६वी ते ८वी गट व इयत्ता ९वी ते १२वी गटात मुख्याध्यापक श्री.एम.ए.थरकार यांच्या मार्गदर्शनात संपन्न झाले.
१ जानेवारी ते १० जानेवारी २०२३ या कालावधीत “चला जाणुया नदीला ” या अभियानांतर्गत शाळा स्तरावर निबंध स्पर्धा , वकतृत्व स्पर्धा , चित्रकला स्पर्धा व प्रभात (जनजागृती ) फेरी हे उपक्रम राबविण्याचे नियोजन होते.
“चला जाणुया नदीला ” या अभियानांतर्गत शालेय स्तरावर नदीचे व पाण्याचे महत्त्व याबाबत विद्यार्थ्यांची घोषणांनी प्रभात (जनजागृती )फेरी पाटपन्हाळे हायस्कूल व शृंगारतळी बाजारपेठ या परिसरामध्ये सादर करण्यात आली.शालेयस्तरीय निबंध स्पर्धेत इयत्ता १ली ते ५ वी या गटात कु.कस्तुरी संतोष घाणेकर – ५ वी – प्रथम क्रमांक , ६ वी ते ८ वी गटात कु. मानसी संदीप पालकर – ७ वी – प्रथम क्रमांक , इयत्ता ९ वी ते १२ वी गटात कु. जान्हवी प्रफुल्ल विचारे – ११ वी – वाणिज्य शाखा हिने प्रथम क्रमांक संपादन केला. वकतृत्व स्पर्धेत इयत्ता ६ वी ते ८वी गटात कु. मृण्मयी दत्ताराम जाधव – ७ वी – प्रथम क्रमांक , इयत्ता ९वी ते १२वी गटात – कु.आर्या निलेश चाळके – नववी – हिने प्रथम क्रमांक संपादन केला. चित्रकला स्पर्धेत इयत्ता ६ वी ते ८वी गटात कु. श्रीया संतोष नागेश – ७ वी – प्रथम क्रमांक व इयत्ता ९ वी ते १२ वी गटात – कु. हर्ष नागेश जानवळकर – ९ वी याने प्रथम क्रमांक संपादन केला. “चला जाणुया नदीला ” या अभियानांतर्गत न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे या विद्यालयात शाळास्तरीय उपक्रम राबविण्याचे नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ.एस.एस.चव्हाण व सहकारी शिक्षक यांनी केले होते. निबंध , वक्तृत्व,‌ चित्रकला या स्पर्धेतील सुयशस्वी विद्यार्थी व सहभागी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष भालचंद्र चव्हाण, उपाध्यक्षा सुचिता वेल्हाळ, सचिव सुधाकर चव्हाण व पदाधिकारी , मुख्याध्यापक एम.ए.थरकार व शिक्षकवृंद यांनी अभिनंदन केले.