रत्नागिरीतील ज्येष्ठ रंगकर्मी श्री. वामनराव जोग यांचे मार्गदर्शन
रत्नागिरी: अनुलोम प्रेरित जनसेवा सामाजिक मंडळ गोळप तर्फे रविवार दि.29 जानेवारी 2023 रोजी दुपारी 2.30 ते 6 या वेळेत पाटणकर हॉल,फिनोलेक्स फाटा,गोळप येथे रंगमंच कार्यशाळा(ओळख) आयोजित करण्यात आली आहे.
रत्नागिरीतील ज्येष्ठ रंगकर्मी श्री. वामनराव जोग हे प्रमुख उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. मार्गदर्शक हे अनेक मालिका, चित्रपट, नाटके यामध्ये अभिनय आणि दिग्दर्शन केलेले आणि त्यात अनेक पारितोषिके मिळालेले, असंख्य कार्यक्रमात सूत्रसंचालक, निवेदक म्हणून उत्तम काम केलेले,आकाशवाणी ए ग्रेड प्राप्त असणारे आहेत.
ग्रामीण भागातील मुलामुलींना आणि ज्यांना सूत्रसंचालन, निवेदन,अभिनय, वक्तृत्व अशा विषयात काही करण्याची ईच्छा आहे अशा सर्वांना मार्गदर्शन मिळावे या हेतूने आयोजन केले असल्याने कार्यशाळा मोफत आहे.परंतु स्वेच्छा मूल्य देऊ शकता.
या कार्यशाळेत वय वर्षे 10 च्या पुढील कोणीही स्त्री पुरुष सहभागी होऊ शकतात. नियोजनासाठी आगाऊ नावनोंदणी 27 जानेवारी 2023 पर्यंत करणे आवश्यक आहे.
अधिक माहिती व नोंदणीसाठी संपर्क अविनाश काळे (मंडळ प्रमुख)9422372212, समित घुडे (सचिव) 9930546868, प्रकाश संते (सहसचिव) 9970565624 यांच्याशी करावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.