लांजा नगरपंचायत चे भाजप नगरसेवक व गटनेते संजय यादव यांचा विकास कामांचा धडाका

डावारा वसाहत येथील रस्ता तर नाईकवाडी येथील शौचालय कामाचे भूमिपूजन 

लांजा (प्रतिनिधी) लांजा नगर पंचायतमधील भाजपाचे नगरसेवक तथा गटनेते संजय यादव यांच्या प्रभाग क्र. १३ मधील डावारा वसाहत येथील रस्ता तर नाईकवाडी येथील शौचालय कामाचे भूमिपूजन आज बुधवारी सकाळी भाजपाचे रत्नागिरी सिंधुदुर्ग चे लोकसभा प्रमुख प्रमोद जठार यांच्या हस्ते झाले.

प्रभाग क्रमांक १३ मधील मुंबई गोवा महामार्ग ते मटकर घर व शिंदेचाळ यांच्या घरापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे या कामाचे आणि नाईकवाडी येथील शौचालय कामाचे भूमिपूजन रत्नागिरी सिंधुदुर्ग चे लोकसभा प्रमुख प्रमोद जठार यांच्या हस्ते सपन्न झाले. या कार्यक्रमाला रत्नागिरी जिल्हा दक्षिण जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, राजापूर विधानसभा निवडणूक प्रमुख उल्का विश्वासराव, जिल्हा सरचिटणीस रवींद् नागरेकर,अमित केतकर, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक व जिल्हा उपाध्यक्ष महेश खामकर ,जिल्हा सचिव हेमंत शेट्ये, निमंत्रित सदस्य विजय कुरूप, तालुकाध्यक्ष चंद्रकांत मांडवकर, महिला तालुकाध्यक्ष प्रणिती सावंत, सरचिटणीस विराज हरमले, शैलेश खामकर, स्वीकृत नगरसेवक नंदराज उर्फ लल्ल्या कुरूप, शहराध्यक्ष गुरुप्रसाद तेली ,नगरसेवक मंगेश लांजेकर, नगरसेविका शितल सावंत, जिल्हा अल्पसंख्यांक अध्यक्ष इकबाल गिरकर ,भरत कोंडवणकर, रवींद्र नारकर ,चंद्रकांत खामकर, शारदा गुरव, तालुका सरचिटणीस साक्षी पराडकर, वार्डामधील अनेक ग्रामस्थ महिला उपस्थित होत्या