१५ पासून आमनायेश्वराचा शिवरात्रोत्सव

माखजन | वार्ताहर : संगमेश्वर तालुक्यातील बुरंबाड येथील श्री देव आमनायेश्वराचा शिवरात्री उत्सव १५ पासून सुरु होत आहे. हेमाडपंथी बांधणी असलेले हे मंदिर प्राचीन असून अनेकांचे श्रद्धास्थान आहे.
या वार्षिक उत्सवा निमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन् करण्यात आले आहे.यामध्ये १५ रोजी सकाळी ९वा संकल्प,तोरण,रुद्राभिषेक, व पूजा रात्री १० वाजता कीर्तन होईल.१६ रोजी सकाळी ९वा विधिवत पूजा,रात्री ९वा भजन व १०वा कीर्तन होईल.१७ रोजी सकाळी रुद्रभिषेक,रात्री ९वा आनंदबुवा लिंगायत यांचे भजन,१० वाजता कीर्तन होईल.
१८ रोजी सकाळी ९ वाजता रुद्रभिषेक,रात्री ९ वा श्रींचे मिरवणुकीने मंदिरात आगमन,यावेळी पालखी सजावट,दीपमाळ प्रज्वलन,रात्री १०.३० वाजता पालखी सोहळा व त्यानंतर कीर्तन होणार आहे.
१९ रोजी सकाळी रुद्रभिषेक, व रात्री १० वाजता तीर्थ प्रसादाचे कीर्तन होईल.
२० रोजी सकाळी ११.३० वाजता महाप्रसाद,व रात्री १० वाजता आमनायेश्वर प्रसादिक नाट्य मंडळ बुरंबाड पुरस्कृत,रत्नागिरी च्या श्रीरंग नाट्य मंडळ निर्मित ‘हिच तर प्रेमाची गंम्मत आहे’ हा नाट्यप्रयोग् होणार आहे.यावर्षी कीर्तनसेवेसाठी पुण्याचे प्रख्यात कीर्तनकार ह.भ.प.हर्षदबुवा जोगळेकर लाभले आहेत.उत्सवा निमित्त होणाऱ्या विविध कार्यक्रमाना उपस्थित राहावे असे आवाहन श्री देव आमनायेश्वर् देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष श्री संजय सहस्त्रबुद्धे, खजिनदार श्री शशिकांत घाणेकर यांनी केले आहे.