देवगड मेडिकल फाउंडेशन तर्फे रुग्णांना एक्स-रे साठी अत्याधुनिक CR[कॉम्प्युटराईज्ड रेडिओग्राफी] सुविधा पुरविण्यात येत होती .
या सुविधेमुळे गेली तेरा वर्षे आधुनिक पद्धतीचे डिजिटल एक्स-रे रुग्णांसाठी आपल्याकडे उपलब्ध होते .
बदलत्या तंत्रज्ञानाचा पेशंटना अधिकाधिक पद्धतीने फायदा करून देण्यासाठी आता आपण देवगड मेडिकल फाउंडेशन तर्फे जपानी तंत्रज्ञानाची DDR [डायनामिक डायरेक्ट रेडिओग्राफी] एक्स रे सिस्टीम बसवण्यात आली आहे.या फिफ्थ जनरेशन सिस्टीम मुळे 100 मायक्रोन पर्यंतच्या प्रतिमेचे आकलन करणे सोयीस्कर झाले आहे.तसेच अधिक स्पष्ट आणि दर्जेदार एक्स-रे देणे शक्य झाले आहे .
भविष्यकाळात रिअल टाईम एक्स-रे ची ही सुविधा उपलब्ध करून देता येईल. उदाहरणार्थ हालचाल करणारा गुडघा किंवा श्वास घेताना डायफ्रामच्या हालचाली किंवा खांद्याच्या प्रत्यक्ष हालचाली.
आपण सर्व रुग्णांना साध्या कागदावर अथवा थर्मल प्रिंट न देता अतिशय उत्तम दर्जाची लेसर प्रिंट देतो.
ही सिस्टीम अत्यंत महागडी असून महाराष्ट्रातलं हे तिसरं इन्स्टॉलेशन आहे तर भारतातलं पाचव्या क्रमांकाचे आहे.
तरी देखील पेशंटला आपण पूर्वीच्या दरानेच एक्स रे सुविधा उपलब्ध करून देत आहे .
या सुविधेचे उद्घाटन कुडाळ आयएमए प्रेसिडेंट आणि महाराष्ट्र स्टेट आयएमएचे जॉईंट सेक्रेटरी आणि कुडाळ रोटरी क्लबचे ट्रेझरर डॉ संजय केसरे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला देवगड ग्रामीण रुग्णालयाचे डॉ संदीप भगत डॉ संजय विटेकर डॉ जगदीश तेंडुलकर व समाजातील मान्यवर उपस्थित होते