आजही न्यायव्यवस्थेसाठी रामशास्त्री प्रभुणे सर्वोच्च : न्या महेश सोनंक

Google search engine
Google search engine

पणजी : रामशास्त्री प्रभुणे आजही न्यायप्रक्रियेसाठी सर्वोच्च आदर्श आहेत . विदेशी न्यायतत्वे भारतीय असून भारतीय शास्त्रवर अवलंबून आहेत सामान्यांना आजही न्यायालयातबाबत विश्वास वाटतो त्यामुळे त्यांच्या हक्काचे संरक्षण करणे न्यायालयाचे काम आहे .,असे मत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती महेश सोनंक यांनी ॲड विलास पाटणे यांच्या रामशास्त्री या पुस्तकाच्या ॲड रमाकांत खलप यांच्या इंग्रजी अनुवादींत पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी पणजीत केले व्यक्त केले न्यायव्यवस्था लोकशाहीचा तिसरा खांब म्हणून ओळखली जाते कुणाच्या दबावाखाली न येता निःपक्ष न्याय देण्याची गरज आहे असेही त्यांनी पुढे सांगितले .

न्यायाधिश म्हणून रामशास्त्रींचे स्थान अद्वितीय आहे .निस्पृह, बाणेदार, निष्कलंक असे त्यांचे चरित्र न्यायसंस्थेला दीपस्तंभाप्रमाणे आहे . त्यांचे चरित्र जागतिक व्यासपीठावर जाण्याची गरज आहे .याच भूमिकेतून रामशास्त्री पुस्तकाच्या इंग्रजी संस्करणाचा प्रयोग केला आहे असे लेखक ॲड विलास पाटणे यांनी मनोगतात उदगार काढले . तसेच सर्वोच्च न्यायालय अंतिम आहे हे खरे आहे परंतु सत्य अंतिम आहे हे आपण सर्वांनी लक्षात घेतले पाहिेजे असेही त्यांनी सांगितले

गोवा सरकारचे ॲडहोकेट जनरल श्री देविदासजी पांगंम यांनी रामशास्त्री पुस्तकं ज्ञानाचा ठेवा असल्याने न्यायव्यवस्थेला त्याची गरज असल्याचे सांगितले माजी कायदामंत्री अँड रमाकांत खलप यानी रामशास्त्री पुस्तकाच्या इंग्रजी संस्करणाचा संकल्प , पूर्णत्वास नेला याविषयी आनंद व्यक्त केला ,रामशास्त्री यांच चरित्र वैश्विक न्यायव्यवस्थेच्या संदर्भात महत्वाचे असल्याने पणजी हायकोर्ट बारचे अध्यक्ष ॲड जीलमान परेरा यांनी सांगितले .पणजी येथील सेंट्रल लायब्ररी मध्ये संपन्न झालेल्या प्रकाशन समारंभाला रसिकांची चांगली उपस्थिती होती