खोपी तांबडवाडी ग्रामस्थांचे १५ रोजी आमरण उपोषण

 

खेड(प्रतिनिधी) खेड तालुक्यातील खोपी तांबडवाडी येथील निलंबित पोलीस पाटील श्री. प्रशांत लक्ष्मण भोसले यांच्या विरुध्द बडर्तफ कारवाई होण्याबाबतच्या मागणी साठी खोपी तांबडवाडी ग्रामस्थ १५ फेब्रुवारी रोजी येथील तहसीलदार कार्यालया समोर आमरण उपोषण छेडणार आहेत तसे आशयाचे निवेदन
उपविभागीय अधिकारी खेड, पोलीस निरीक्षक, तहसीलदार यांना सादर करण्यात आले आहे.

निलंबित पोलीस पाटील प्रशांत भोसले यांच्या विरुध्द ग्रामस्थांनी तक्रार केल्याने त्यांस ६ महिन्या करिता निलंबित आदेश देण्यात आले होते. पोलीस पाटील विरुध्द वारंवार गंभीर स्वरूपाच्या तक्रारी व खेड पोलीस ठाणे यथे अदखलपात्र गुन्हे नोंद झाले होते. तरी सुद्धा त्यांस बडतर्फ न करता साध्या स्वरूपाचे सहा महिन्याचे निलंबनाचे आदेश देण्यात आले. सदरचे निलंबनाचे आदेश दिल्यानंतर हि त्यांच्या वर्तुनुकीस काही फरक पडलेला नाही असा ग्रामस्थांचा आरोप असून त्यांनी तसे निवेदनात नमूद केले आहे

दरम्यान, खोपी तांबडवाडी ग्रामस्थ निलंबित पोलीस पाटील यांच्या दहशतीमुळे व बडर्तफ करण्याकरिता ग्रामस्थांनी ५ फेब्रुवारी रोजी तक्रार अर्ज ठरावा सह देण्यात आला होता. मात्र त्यावर कोणत्याही स्वरूपाची कार्यवाही न झाल्या मूळे खोपी तांबडवाडी ग्रामस्थ १५ रोजी खेड तहसिलदार कार्यालया समोर आमरण उपोषणाला बसणार आहेत.