खेड(प्रतिनिधी) खेड तालुक्यातील तळे कॉलेजचे प्राचार्य बाबासाहेब कांबळे यांना साहित्य साधना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.चंदुर तालुका हातकणंगले येथे झालेल्या सोळाव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनामध्ये साहित्य क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते श्री कांबळे यांना साहित्य साधना पुरस्काराने गौरवण्यात आले.यावेळी त्यांना स्मृतीचिन्ह प्रशस्तीपत्र गौरव पत्र शाल श्रीफळ देऊनसत्कार करण्यात आला
यावेळी संमेलन अध्यक्ष डॉक्टर चंद्रकांत पोतदार ,उद्घाटक ,डॉ. सपना आवाडे, डॉ.श्रीकांत पाटील , राजेंद्र कामत , मदनलाल कुलकर्णी, महेश पाटील ,डॉ सुरेश कुराडे , भाऊसाहेब कांबळे, कवी सरकार इत्यादी उपस्थित होते.श्री कांबळे हे हे कनिष्ठ कला वाणिज्य महाविद्याल तळे ता.खेड येथे प्राचार्य या पदावर कार्यरत आहेत.
सच्चा समाजसेवक, बहुजनांचा सखा,प्रातिनिधीक कविता संग्रह इत्यादी पुस्तके प्रकाशित झाली आहेत तसेच अनेक वैचारिक लेख प्रकाशित झाले आहेत. येणाऱ्या काळात “बिघडलो “कथासंग्रह ,मंथन कवितासंग्रह, लोकसाहित्यातील म्हणींचा अभ्यास.इत्यादी पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. तसेच त्यांना जिल्हा व राज्यस्तरावरील अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.










