खेड (प्रतिनिधी) तालुका कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने तालुक्यातील कुंभाड येथील श्री गणेश मित्र मंडळाच्या वतीने श्रीसंत शिरोमणी गोरोबाकाकापुण्यतिथीनिमित्त ६ व ७ मे रोजी तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेतील विजेत्यास ११हजार,१११ रूपये, उपविजेत्यास ७हजार,७७७ रूपये, तृतीय क्रमांकास ५,हजार५५५ रूपये व चतुर्थ क्रमांकास ३हजार.३३३ रूपये व चषक देवून गौरवण्यात येणार आहे. याशिवाय उत्कृष्ट चढाई, उत्कृष्ट पकड, सर्वोत्कृष्ट खेळाडू यांनाही चषक देवून गौरवण्यात येणार आहे. प्रत्येक सामन्यातील उत्कृष्ट खेळाडूस पारितोषिक देवून सन्मानित करण्यात येणार आहे.










