रत्नागिरी (प्रतिनिधी)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली शक्तीशाली भारताचा जगात दबदबा झाला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा तिसऱ्यांदा मोदींना पंतप्रधान करण्यासाठी महायुतीचे उमेदवार नारायण राणे हे ४०० पार मध्ये आपल्या हक्काचे खासदार म्हणून हवे आहेत. त्यामुळे आजपासून पुढील तीन दिवस देशासाठी द्या, घरोघरी प्रचार करा, आणि ना. राणे यांना सर्वाधिकमताधिक्याने निवडून आणा, असे आवाहन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
ना. राणे यांनी बाळासाहेबांच्या सहवासात दिवस घालवले आहेत. एक स्वाभिमानी आणि कर्तृत्ववान नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. ना. राणे यांनी मुख्यमंत्री म्हणून संपूर्ण राज्याचा विकास केला असून त्यामुळे राज्याला बळ मिळाले. समाजातील शेवटच्या माणसासाठी झटणारा हा नेता असून त्याची ही निवडणूक आहे. त्यांनी एमएसएमईच्या माध्यमातूनही देशभरात मोठ्या प्रमाणात विकास केला आहे. आज कोकण विकासासाठी त्यांना निवडून देण्यासाठी रत्नागिरी सिंधुदुर्गमधील जनतेने सज्ज झाले पाहिजे, असे आवाहन बावनकुळे यांनी केले.












