ओटवणे(प्रतिनीधी) बांदा दाणोली मार्गातील रस्त्यावर पडलेली दरड अखेर संबंधित यंत्रणेकडून स्थानिकांच्या मदतीने अथक प्रयत्नाने हटवण्यात आली व रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. पावसात कोसळलेल्या डोंगराचां ढिगारा अखेर भर पवासात अथक मेहनतीने दुर कऱण्यात आला.सार्वजनिक बांधकाम चे लोहार साहेब स्वतः हजर राहून दरड हटवून घेतली. सरमळे सरपंच विजय गावडे सह ग्रामस्थ मदतीला उपस्थित होते.बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांचे वाहन चालकांमधून आभार मानण्यात आले











