दि. 8 ऑक्टोबर, 2024 रोजी हरियाणा राज्यात बहुमताने तिसऱ्यांदा विजय मिळवून हॅट्रिक साधली आहे, तसेच जम्मू काश्मीरमध्येही चांगले यश प्राप्त झाले आहे.
या विजयाचा जल्लोष आज देवगड भाजपाच्या कार्यालयात सायंकाळी साजरा करण्यात आला. या समारंभास जिल्हा उपाध्यक्षा प्रियांका साळसकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य राजा भुजबळ, महिला अध्यक्षा उषा कला केळुसकर, शहर अध्यक्ष योगेश पाटकर, युवा अध्यक्ष दया पाटील, महिला शहर अध्यक्षा तन्वी शिंदे, उपाध्यक्ष निखिल कोयघाडी, नगरसेवक मनिषा जामसंडेकर, माजी नगराध्यक्षा योगेश चांदोस्कर, नगरसेवक बापू जुवाटकर, शक्तिकेंद्र प्रमुख गणपत गावकर, उल्हास मणचेकर आणि दिलेश साटम उपस्थित होते.
या विजयामुळे कार्यकर्त्यांमध्ये आनंद आणि उत्साहाचे वातावरण आहे.












