संगलटमध्ये बिबट्याची दहशत

खेड (प्रतिनिधी) खेड तालुक्यातील खारीपट्टा भागातील संगलट परिसरामध्ये बिबट्याच्या वावरा मुळे दहशत निर्माण झाली आहे  लोक वस्तीमध्ये  बिबट्या शिरू  लागल्याने  नागरिकांत घबराटी चे वातावरण निर्माण झाले आहे
शुक्रवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास  बिबट्या लोक वस्तीमध्ये घुसून  कुत्र्याची शिकार केली  नागरिकांनी उठून पाहिले असता बिबट्या कुत्र्याची शिकार करताना आढळून आला त्यामुळे नागरिकातून घबराट   निर्माण झाली आहे सध्या दिवाळी साजरी  सुरू असताना नागरिक उशिरा झोपे जात असतात मात्र बिबट्याच्या दहशती मुले घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे  बिबट्याचा त्वरित बंदोबस्त वन खात्याने करावे अशी मागणी संगलट गावचे सामाजिक कार्यकर्ते हमीद भाई नाडकर यांनी केली आहे