खंडाळा l वार्ताहर = मराठी संस्कृतीची परंपरा व पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या रितीरिवाज याचे पालन करीत रत्नागिरी तालुक्यातील पन्हाळी गावामध्ये वटपौर्णिमा साजरी करण्यात आली. वटपौर्णिमेच्या दिवशी वटवृक्षाची मनोभावे भक्तीमय वातावरणात पूजा आर्चा करण्यात आली. हा सण वटपौर्णिमा म्हणजेच सात जन्मी हाच पती मिळून दे अशी सौभाग्यवती वटवृक्षाला प्रार्थना करतात या पौर्णिमेच्या दिवशी नव विवाहित सौभाग्यवती खास आकर्षण असते त्या नवविवाहित स्त्रिया हळद कुंकू अक्षता पुष्प नैवेद्य दाखवून पूजा करतात वडाच्या झाडाला दोरा गुंडाळून सात फेरे मारतात व सात जन्मी हाच पती मिळून दे अशी प्रार्थना करतात ही पूजा झाल्यावर नवविवाहित स्त्रिया आपल्या सासरच्या देवाला आंब्या, फणस गरे, जांभुळ, करवंद, अननस,सहित जात फळ्यांचा नैवेद्य दाखवतात व सासरी व माहेरी त्याचे आपल्या कुटुंबामध्ये घरोघरी जाऊन वान वाटतात













