नवी मुंबई | प्रतिनिधी :श्री बहिरीनाथ दीपोत्सव मंडळ, दिवाळे कोळीवाडा, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई यांच्यातर्फे मा. ना. श्री. नितेश राणे, कॅबिनेट मंत्री, मत्स्य व बंदर विकास विभाग, महाराष्ट्र शासन यांचे विशेष आभार मानण्यात आले आहेत. मंडळाने केलेल्या मागणीला मान्यता देत दिवाळे कोळीवाडा येथील श्री बहिरीनाथ देवाच्या समुद्रातील स्थळी दोन स्थायी रेड सिग्नल बसविण्यात आले आहेत.
या रेड सिग्नलच्या स्थापनेमुळे परिसरातील मच्छीमार आणि स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेला मोठी मदत होणार आहे. कोळी समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या श्री बहिरीनाथ देवाच्या स्थळाचे संरक्षण अधिक बळकट होणार आहे, असे मंडळाचे अध्यक्ष श्री. अरुण शिमग्या कोळी यांनी सांगितले.
या उपक्रमामुळे समुद्रात ये-जा करणाऱ्या मच्छीमारांना मार्गदर्शन मिळेल. मंडळातर्फे मा. ना. नितेश राणे यांना भावी आयुष्यात यश, उत्तम आरोग्य व उज्ज्वल कार्यकिर्दीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.










