*देवरूख (प्रतिनिधी)* संगमेश्वर तालुक्यातील भडकंबा येथील अक्षय सरिता शांताराम मांगडे याने बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि मुंबई वकील म्हणून पदवी मिळवली आहे. याबद्दल त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे. अक्षय मांगडे हा भडकंबा (पाष्टेवाडी) गावच्या इतिहासातील पहिला एलएलबी (वकील ) पदवी मिळवणारा तरुण ठरला आहे.
अक्षय याने आपले प्राथमिक शिक्षण ग्रामीण भागातून घेऊन आपल्या कठीण परिस्थितीवर मात करून वकिलीची परीक्षेत उत्तीर्ण होऊन वकिलीची पदवी संपादन केली आहे. अक्षय याने पहिली ते चौथी जिल्हा परिषद शाळा भडकंबा पाष्टेवाडी व पाचवी ते सातवी जिल्हा परिषद शाळा भडकंबा नवालेवाडी या शाळेतून या ग्रामीण भागातून शिक्षण घेऊन पुढील शिक्षण मुंबई मधून घेऊन एम. ए. बी. एड , बी. कॉम. त्याच बरोबर एल. एल. बी. (वकील ) चे शिक्षण पूर्ण केलेले आहे. ग्रामीण भागातील मुलांनी अक्षयचा आदर्श घेण्यासारखा आहे. अक्षयचे मुंबई हायकोर्टातील वकील अँड. अजय पाटील यांनी विशेष अभिनंदन केले आहे.












