गुहागरच्या कन्येचा उत्तराखंडात डंका

स्पीड ट्रेकींग स्पर्धेत दोन सुवर्ण, दोन रौप्यपदक

गुहागर/प्रतिनिधी – मुळची गुहागरची मात्र सध्या मुंबई-ठाणे येथे वास्तव्यास असलेली ओवी सुदर्शन शेटे हिने उत्तराखंड-डेहराडून येथे झालेल्या आईस लाँग टॅक्स स्पीड टेकींग चॅम्पियनशिप स्पर्धेत दोन सुवर्ण तर आईस शॉर्ट ट्रॅक स्पीड ट्रेकींगमध्ये दोन रौप्यपदके पटकावली आहेत.

 

 

 

ओवी शेटे मुंबई-ठाणे येथील हिरानंदनी इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता सातवीच्या वर्गात शिकत आहे. ओवी सध्या ठाणे येथील राईस क्लबमध्ये स्केटींगचे प्रशिक्षण घेत आहे. यासाठी तिला प्रशिक्षक राहुल पंदीरकर आणि तिची आई रिना सुदर्शन शेटे-परब यांचे मार्गदर्शन लाभत आहे. ओवीने यापूर्वी अनेक जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आईस स्केटींग आणि रोड स्केटींग स्पर्धेमध्ये अनेक पदके मिळवली आहेत. ओवी गुहागर येथील उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, जि. प. माजी सदस्य सुरेश शेटे व समाजसेवक बाबा परब यांची नात आहे. तिच्या या घवघवीत यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.