हातखंबा येथे दुचाकीस्वराच्या मृत्यूस कारणीभूत अज्ञात डंपरचालकावर गुन्हा दाखल

रत्नागिरी ः प्रतिनिधी
बेदरकारपणे डंपर चालवून दोन दुचाकींना धडक देत त्यातील एका दुचाकीस्वाराच्या मृत्यू कारणीभूत ठरल्याप्रकरणी अज्ञात डंपर चालकाविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची ही घटना शनिवार 28 जून रोजी सकाळी 9.30 वा.सुमारास हातखंबा-नागपूर महामार्गावरी घडली.
याबाबत दर्शन महेश बाईंत (24,रा.हातखंबा गुरववाडी,रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार, शनिवारी सकाळी फिर्यादी हे आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच-08-एजे-4092) वरुन मित्र श्ाुभम नागले सोबत रत्नागिरीत येत होते. त्यावेळी मागून येणार्‍या अज्ञात पिवळ्य रंगाच्या डंपरने त्यांच्या दुचाकिला धडक देत अपघात केला. यात ते दोघेही रस्त्यावर पडले.
त्याचवेळी मागून येणार्‍या एका दुचाकस्वाराला थांबवून त्यांनी त्या डंपरचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. असता त्याच डंपरने त्याच्या पुढील अ‍ॅक्सेस दुचाकी (एमएच-08-एएल-0670) ला धडक देउन पळ काढला. यात त्या अ‍ॅक्सेस दुचाकीवरील मंगेश मधुकर भस्मे (42,रा.पाली,रत्नागिरी) यांचा मृत्यू झाला. या अपघाताची नोंद ग्रामीण पोलिस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.