रत्नागिरी /वार्ताहर
केंद्रीय शिक्षामंत्री धर्मेंद्र प्रधान यांची अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या केंद्रीय अध्यक्ष बसवराज गुर्रीकर, महासचिव कमलाकर त्रिपाठी यांनी काल भेट घेऊन प्राथमिक शिक्षकांच्या विविध अडीअडचणी , तसेच अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न मार्गी लावण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शिक्षकांना जुनी पेन्शन योजना ताबडतोब लागू करावी, शिक्षकांवर गुन्हे नोंद करताना पार्श्वभूमीचा सखोल अभ्यास करावा ,अनावश्यक गुन्हे नोंद करू नयेत., शिक्षकांना जनगणना , निवडणूका , या व्यतिरिक्त अन्य कोणतीच कामे देऊ नयेत, सर्व राज्यांमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यां प्रमाणे सर्व शिक्षकांना आठवा वेतन आयोग लागू करावा आदि प्रमुख मागण्यांवर चर्चा करण्यात आली.अशी माहिती अखिल भारतीय शिक्षक संघाचे रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष माननीय श्री.दिलीपजी देवळेकर सर यांनी माहिती दिली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील शिक्षकांचे विविध प्रश्न, अडीअडचणी सोडवण्यासाठी अखिल भारतीय शिक्षक संघाचे रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष माननीय श्री.दिलीपजी देवळेकर सर नेहमीच तत्पर असतात.
फोटो =केंद्रीय शिक्षामंत्री धर्मेंद्र प्रधान यांची अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाने भेट घेतली त्या प्रसंगी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे केंद्रीय अध्यक्ष बसवराज गुर्रीकर, महासचिव कमलाकर त्रिपाठी आदि पदाधिकारी











