एकटेपणाचा मनस्ताप; वृद्धाने गळफास घेऊन दिला जीवनयात्रेस पूर्णविराम

दापोली : प्रतिनिधी

तालुक्यातील तळवटकर वाडी येथे राहणारे सदाशिव गुणाजी ठसाळ (वय 66) यांनी एकटेपणास कंटाळून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. त्यांनी आपल्या राहत्या घरातील माजघरात नायलॉनच्या दोरीने गळफास घेतला.

ही घटना 28 जुलै 2025 रोजी सकाळी 10 वाजण्याच्या आत घडली. माजघरात लाकडी भालाला दोरी लावून त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला. त्यांनी एकाकीपणाच्या त्रासातून हे पाऊल उचलल्याचे प्राथमिक माहितीवरून स्पष्ट होत आहे.

या प्रकरणाची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद दुपारी 4 वाजून 5 मिनिटांनी दापोली पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.