मसुरे | झुंजार पेडणेकर :देवगड तालुक्यातील मुणगे करिवणे शाळेत पर्यावरण संवर्धनाचा एक आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांनी झाडाला राखी बांधून रक्षाबंधन सण मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला. यावेळी शिक्षक श्री. प्रविण सावरे यांनी आपल्या मार्गदर्शनातून मुलांमध्ये निसर्गाविषयी प्रेम, जबाबदारीची जाणीव व पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना वृक्षाचे महत्त्व पटवून देणे आणि त्याचे संरक्षण करण्याची प्रतिज्ञा घेणे हा होता.यावेळी शिक्षक श्री. प्रविण दत्तात्रय सावरे
स्वयसेविका श्रीम. चंदना मेस्त्री
अंगणवाडी सेविका – श्रीम. दिपीका बागवे
मदतनीस श्रीम.अश्विनी मुणगेकर
श्रीम. रिया सावंत
व ग्रामस्थ उपस्थित होते












