ग्राहकांनी तक्रारींसाठी 1800 222365 वर संपर्क साधावा – सहाय्यक आयुक्त नि. दि. मोहिते
रत्नागिरी : सणासुदीच्या काळात मिठाई व इतर अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत दक्षता घेण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त नि. दि. मोहिते यांनी केले आहे. अन्नपदार्थ पॅकींग करताना वर्तमानपत्राचा वापर करू नये, मिठाईत केवळ फूडग्रेड खाद्य रंगाचाच अत्यल्प प्रमाणात (100 PPM पेक्षा कमी) वापर करावा, असे त्यांनी सांगितले.
ग्राहकांनी अन्नपदार्थाच्या दर्जासंबंधी कोणत्याही तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक 1800 222365 वर संपर्क साधावा.
सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मिठाई उत्पादक, विक्रेते व हॉटेल व्यावसायिकांसाठी प्रशासनाने दिलेल्या काही महत्त्वाच्या सूचना:
-
आस्थापना स्वच्छ, पर्यावरणीय दृष्ट्या सुरक्षित व किटकांपासून संरक्षित असावी.
-
कच्चे अन्नपदार्थ परवानाधारक व्यावसायिकांकडूनच खरेदी करावेत.
-
पिण्यायोग्य पाण्याचा वापर करावा व त्याचा अहवाल ठेवावा.
-
तयार अन्नपदार्थ व्यवस्थित झाकून स्वच्छ ठिकाणी ठेवावेत.
-
आजारी व्यक्तींनी अन्नपदार्थ हाताळू नयेत.
-
बंगाली मिठाई २४ तासांच्या आत खाण्याबाबत ग्राहकांना सूचित करावे.
-
सोनेरी/चांदीचा वर्ख उच्च प्रतीचा व योग्य दर्जाचा असावा.
-
मिठाई तयार करणाऱ्या व हाताळणाऱ्या व्यक्तींनी टोपी, मास्क, हातमोजे व अॅप्रन वापरावे.
-
नियमित पेस्ट कंट्रोल करून त्याचा अभिलेखा ठेवावा.
-
कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करून अभिलेखा ठेवावा.
-
प्रत्येक २५ कर्मचाऱ्यांमागे एक प्रशिक्षित Food Safety Supervisor नियुक्त करावा.
प्रशासनाने नमूद केलेल्या सर्व नियमांचे पालन करूनच अन्नपदार्थ विक्री व सेवा करावीत, असेही आवाहन करण्यात आले आहे.












