आयडियल स्कूल नाटे येथे सोमवार १३ ऑक्टोबर रोजी मोफत नेत्रतपासणी शिबिर

राजापूर (वार्ताहर): इन्फिगो आय केअर हॉस्पिटल रत्नागिरी आणि नाटे एज्युकेशन सोसायटी संचलित आयडियल इंग्लिश मिडियम स्कूल नाटे यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि. १३ ऑक्टोबर रोजी मोफत नेत्रतपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
हे शिबिर आयडियल इंग्लिश मिडियम स्कूल नाटे येथे सकाळी १० ते दुपारी २ या वेळात होणार आहे. या शिबिरात आयडियल इंग्लिश मिडियम स्कूलमधील सर्व विद्यार्थी तसेच पालक व नातेवाईकांची मोफत नेत्रतपासणी करून उपचार केले जाणार आहेत.
इन्फिगो आय केअर हॉस्पिटल हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे हॉस्पिटल नेटवर्क असून त्यांच्या माध्यमातून अत्याधुनिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया, काचबिंदू निदान आणि उपचार, तिरळेपणा, चष्म्याचा अचूक नंबर, मुलांचे डोळयाचे विकार यावर उपचार केले जातात. अशा व्यवस्थापनाच्या माध्यमातून मोफत नेत्र तपासणीची सुविधा नाटे एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातुन उपलब्ध करण्यात आली असून या शिबिरात जास्तीत जास्त पालक व नातेवाईकांनी लाभ घ्यावा असे आवाहन नाटे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष किरण टिळेकर, सेक्रेटरी फरहाना फणसोपकर यांनी केले आहे.