एका घरावर वीज तर दुसऱ्या घराचे पत्रे उडून गेले.दोन घरांचे लाखोंचे नुकसान.
ओटवणे (प्रतिनिधी) वादळी वारा आणि गडगडाटसह जोरदार कोसळलेल्या पावसाचा दणका ओटवणे परिसराला बसला असून ओटवणे देऊळवाडी येथील दशरथ विष्णू गावकर यांच्या घरावर वीज कोसळून भिंतीना भेगा पडून लाखोची हानी झाली. तर दत्तात्रय नारायण गावकर यांच्या घराचे वादळी वाऱ्याने पत्रे उडून जाऊन मोठे नुकसान झाले.दोन्ही घराचे मिळून सुमारे अडीच ते तीन लाखाचे नुकसान झाले.वादळ येवढे प्रचंड होते की दुमजली घराचे लोखंडी छप्पर २५ मीटर अंतरावर जाऊन कोसळले . या घटनेत दोन्ही घरांचे सुमारे अडीच ते तीन लाख रुपयांचे नुकसान झाले.मात्र सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही.
या घटनेत दशरथ गावकर यांच्या घराच्या भिंतींना तडे जाऊन घराच्या भिंती कमकुवत बनल्या. तसेच दरवाजाचेही नुकसान झाले. या घटनेत संतोष महादेव गावकर यांच्या घराचे तीन पत्रे फुटून नुकसान झाले. तर रामदास गावकर यांच्या घरावरही माड कोसळून नुकसान झाले .या वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी विद्युत वाहिन्या तुटून विद्युत पुरवठाही खंडित झाला.तर या परिसरातील बाग बागायतीला मोठा फटका बसला असून परिसरातील केळी च्या बागायतीचे मोठे नुकसाना झाले.












