विजयदुर्ग (प्रतिनिधी) : गडकिल्ले संवर्धन संस्था महाराष्ट्र राज्य, कोकण विभाग यांच्यावतीने किल्ले विजयदुर्ग येथे गडपूजन आणि दीपोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार दि. २२ ऑक्टोंबर २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला सर्व किल्लेप्रेमी, विजयदुर्गवासीय तसेच पंचक्रोशीतील इतिहासप्रेमींनी उपस्थित रहावे असं आवाहन गडकिल्ले संवर्धन संस्था कोकण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे आहे.
सकाळी ८ ते दुपारी १ वाजेपर्यंत किल्ले विजयदुर्गचा महादरवाजा, आई भवानी मंदिर आणि हनुमान मंदिर या भागातील स्वच्छता मोहीम राबविण्यात येईल. दुपारी ३ ते ५ छत्रपती शिवाजी महाराज यांची पालखी मिरवणूक. सायंकाळी ५ ते ६ गडपूजन करण्यात येईल. सायंकाळी ६ ते ७ दीप प्रज्वलन. साडेसात वाजता आई भवानी मंदिर येथे महाआरती व शिव वंदना कार्यक्रमाची सांगता आणि रात्री ८ ते १० या वेळेत स्नेहभोजन कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.













