चिपळूण शहरातील कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

चिपळूण (प्रतिनिधी):- काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष लियाकत शाह यांच्यासह शिवसेना उबाठाच्या कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. तर आता चिपळूण शहरातील आणखी काही कार्यकर्त्यांनी भाजप नेते प्रशांत यादव यांच्या नेतृत्वाखाली भाजपात प्रवेश केला. हा पक्ष प्रवेश कार्यक्रम खेर्डी येथे यादव यांच्या निवासस्थानी पार पडला.

यावेळी आरिफ हजवानी, नथुराम रेडीज, शउफ सुर्वे, सलिम गोटे, निहास गोटे, साद सुर्वे, प्रविण पवार, महेंद्र सावंत, आकाश सावंत, ​अभिषेक गायकवाड, विक्रांत गनरे, प्रदिप जाधव, सुमित पवार, सुजित पवार यांनी भाजपात प्रवेश केला.

यावेळी प्रशांत यादव यांनी आपल्या मनोगतात भाजप हा पक्ष विकासाच्या दिशेने वाटचाल करणारा पक्ष आहे. तसेच कार्यकर्त्यांना या पक्षाकडून मान- सन्मान मिळतो. याप्रमाणे तुमचा देखील पक्षात मान-सन्मान ठेवला जाईल, अशी ग्वाही यादव यांनी प्रवेशकर्त्यांना दिली.

यावेळी भाजपाचे विनोद सुर्वे, नगरसेवक शुभम पिसे, लियाकत शहा, स्वाती देवळेकर, इम्तियाज कड, फैसल पिळपिले, सुरेश मांडतकर, सिकंदर नायकवाडी यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आदी उपस्थित होते.