भारतीय जनता पार्टी रत्नागिरीच्या वतीने आविष्कार संस्थेतील विद्यार्थ्यांना फळ वाटप करण्यात येणार
रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार,महायुतीचे कुडाळ-मालवण विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार निलेश राणे यांच्या १७ मार्च रोजीच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कट्टर राणे समर्थक,भारतीय जनता पार्टी रत्नागिरी दक्षिणचे माजी चिटणीस अशोक वाडेकर यांच्या आयोजनातून भारतीय जनता पार्टी रत्नागिरीच्या वतीने प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत मंगळवार दि १७ मार्च रोजी सकाळी ११.०० वाजता रत्नागिरी टीआरपी येथील हिरो शोरूमच्या बाजूला असणाऱ्या आविष्कार संस्थेतील विद्यार्थ्यांना फळांचे वाटप करण्यात येणार आहे.











