निवतिबंदर येथील महाविष्णु मंदिराचा 24 पासून वर्धापन दिन सोहळा!

 

मसुरे | झुंजार पेडणेकर : निवतीबंदर येथील श्री महाविष्णु मंदिराचा व्दितीय वर्धापन दिन सोहळ्या निमित्त २४ ते २६ मार्च या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. २४ रोजी सकाळी ८ वा. हरिपाठ, सायं. ५ वा. ग्रामस्थांची भजने, ६ वा. श्री पावणा

देवी समईनृत्य किंजवडे यांचे समई नृत्य , रात्री ९ वा. महापुरुष महिला भजनमंडळ तारकर्ली यांचे भजन.

बुधवार दि. २५ मार्च रोजी पहाटे

५ ते सकाळी ६ श्री देव महाविष्णु अभ्यंग स्नान , लघुरुद्र, अभिषेक व

यथासान्ग पूजन, भाविकांसाठी

श्रीचे दर्शन, १०वा. हरिपाठ, दुपारी

२ वा. श्रीसत्यनारायणाची महापुजा,

सायं. ६ ते ८ वा. ग्रामस्थांची भजने,

रात्रौ ९ वा. जयहनुमान दशावतार

नाट्यमंडळ मोचेमाड यांचा दशावतारी नाट्यप्रयोग. गुरुवार दि.

२६ मार्च रोजी पहाटे ५ वा. काकड

आरती, दुपारी ११-३० वा. ग्रामस्थ

भजन, १२ वा. रामजन्म आरती,

१२-३० वा. महाप्रसाद, सायं. ५ वा.

हरिपाठ, ७ वा. श्री गांगेश्वर प्रासादिक भजन मंडळ, किर्लोस यांचे दिंडी भजन, रात्रौ ९ वा. सातेरी

महिला दशावतार मंडळ, पावशी,

कुडाळ यांचा दशावतारी नाट्य प्रयोग ‘भक्तांची पाठिराखी आदिमाया’

या सर्व कार्यक्रमांना उपस्थितीचे आवाहन विष्णुमंदिर समितीने केले आहे.