पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या हस्ते सपत्नीक पूजन
उपवनसंरक्षक मिलीश शर्मा यांची प्रमुख उपस्थिती
सावंतवाडी | प्रतिनिधी : सावंतवाडी शहराच्या आध्यात्मिक वैभवात आज एका नवीन अध्यायाची भर पडली. येथील पोलीस स्टेशनच्या समोर नूतन बांधण्यात आलेल्या ‘औदुंबर स्वामी मंदिराचा’ प्राणप्रतिष्ठा सोहळा अत्यंत मंगलमय आणि उत्साही वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्यामुळे संपूर्ण पोलीस ठाणे परिसर आणि सावंतवाडी शहर भक्तीरसात न्हाऊन निघाले होते.
कार्यक्रमाची सुरुवात पहाटे मंत्रघोषाने करण्यात आली. वेदोक्त मंत्रांच्या उच्चारामुळे वातावरणात एक वेगळेच चैतन्य पसरले होते. सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या हस्ते सपत्नीक श्री स्वामी समर्थांच्या मूर्तीची विधीवत प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. मूर्ती प्रतिष्ठापनेनंतर दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम, भजन आणि लघुरुद्र अभिषेक करण्यात आले. स्वामींच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला होता.
या सोहळ्याला प्रशासकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी विशेष उपस्थिती लावली. यामध्ये सावंतवाडी वन विभागाचे उपवनसंरक्षक मिलीश शर्मा, उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे, वनक्षेत्रपाल सुहास पाटील, पोलीस उपनिरीक्षक पंकज शिंदे व जयेश खंदरकर यांचा समावेश होता.
तसेच सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष अनिल निरवडेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख माजी नगराध्यक्ष नगरसेवक संजू परब, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, जिल्हा बँक सदस्य विद्याधर परब आणि सुरेश भोगटे यांनीही मंदिराला भेट देऊन श्रींचे दर्शन घेतले.
मंदिराच्या उभारणीत मोलाचे योगदान देणाऱ्या दानशूर व्यक्तींचा आणि सहकार्यकर्त्यांचा यावेळी यथोचित सन्मान करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने अच्युत भोसले (कार्याध्यक्ष, भोसले नॉलेज सिटी)
शैलेश पै, शैलेश नाबर (उद्योजक)
जितू गावकर (पंचायत समिती सदस्य), गुणाजी गावडे (सरपंच, वेत्ये)
प्रताप मूर्ती, गौरेश सावंत, अरविंद सावंत (शासकीय ठेकेदार)
अमित आसोलकर, अनिकेत आसोलकर (उद्योजक)
तसेच श्रेयस मुंज, मुन्ना मुद्राळे, संदेश परब, विशाल सावंत, गौरव दळवी आणि पोलीस कर्मचारी अमित राऊळ, मनोज राऊत, हनुमंत धोत्रे, गौरेश राणे आदींचा सन्मान करण्यात आला.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी उत्सव समितीच्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली. यामध्ये अमोल टेबकर, भुवन नाईक, अक्षय माशाळ, सचिन मोरजकर, हेमंत पांगम, आनंद काष्टे, आर्या टेंबकर, ओम टेबकर, निरंजन सावंत, निखिल माळकर, नारायण पेंडुरकर, अभिषेक लाखे, प्रज्वल राऊत आणि चंद्रकांत धोत्रे या सदस्यांनी विशेष सहकार्य केले.
दिवसभर चाललेल्या या सोहळ्यासाठी सावंतवाडी शहर आणि परिसरातील स्वामी भक्तांनी मोठी गर्दी केली होती. महाप्रसादाने या मंगलमय सोहळ्याची सांगता झाली. पोलीस स्टेशन समोरील हे औदुंबर स्वामी मंदिर आता भाविकांसाठी श्रद्धेचे एक मुख्य केंद्र बनले आहे.











