गौरव पोंक्षे माखजन :
माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माखजन इंग्लिश स्कूल मध्ये मोठ्या जल्लोषात नवागतांचे स्वागत करण्यात आले
विशेषतः इयत्ता पाचवी व आठवी ला मोठ्या संख्येने नव्याने प्रवेश घेतलेल्या व अन्य वर्गात नव्याने प्रविष्ठ झालेल्या नवीन विद्यार्थ्यांना वाजत गाजत,पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले.यावेळी स्वागतगीते सुरु असल्याने वातावरण मंगलमय झाले होते.यावेळी प्रशालेतील शिक्षिकांनी नवागतांचे औक्षण केले.यावेळी विद्यार्थ्यांना गुळ,शेंगदाणे देऊन तोंड गोड करण्यात आले.यावेळी गुरुदक्षिणा सभागृहात विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरात नवागतांचे स्वागत केले.मुख्याध्यापक महादेव परब,संस्था अध्यक्ष शशिकांत घाणेकर यांनी स्वागत करत शुभेच्छा दिल्या.तर संतोष कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना शिस्तिविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी संस्था अध्यक्ष शशिकांत घाणेकर,सह सचिव दीपक शिगवण,संचालक सुभाष सहस्त्रबुद्धे,मुख्याध्यापक महादेव परब,पर्यवेक्षक अंबादास घाडगे,महादेव शिंदे,संतोष कुलकर्णी,ओंकार नामजोशी, विठ्ठल भोईर,अमोल पाटील,श्रीरंग कुंभार,अभिजित सहस्त्रबुद्धे, सचिन साठे,मानसी कोवळे,रुही पाटणकर,कांचन जंगम,हर्षदा कदम,आदिंसह अन्य शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.











