निलेश आखाडे यांच्या पुढाकाराने शेकडो विद्यार्थ्यांना गणवेश व शैक्षणिक साहित्याचे वाटप
रत्नागिरी:
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रत्नागिरी शहरात भारतीय जनता पार्टीचे शहर सरचिटणीस निलेश आखाडे यांच्या पुढाकाराने प्रभाग क्रमांक ७ मध्ये भव्य शैक्षणिक साहित्य व गणवेश वाटप सोहळा पार पडला. “गरीबांच्या चेहऱ्यावर हास्य” हा मंत्र घेऊन राबवण्यात आलेल्या या उपक्रमात प्रभाग क्र. ७ मधील शासकीय शाळेत शिकणाऱ्या, आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या शेकडो विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी जाऊन सन्मानाने शालेय गणवेश, नव्या वह्या, पॅड, पेन, पेन्सिल किट आणि इतर साहित्याचे वाटप करण्यात आले. निलेश आखाडे यांच्याकडून दरवर्षी हा उपक्रम राबवला जात असून, या वर्षी मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त तो अधिक मोठ्या स्वरूपात घेण्यात आला.
याप्रसंगी बोलताना निलेश आखाडे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमचे प्रेरणास्थान असून त्यांच्या ‘अंत्योदय’ विचाराने प्रेरित होऊन एकाही विद्यार्थ्याच्या शिक्षणात अडथळा येऊ नये या भावनेने हा प्रयत्न केला आहे. या सामाजिक उपक्रमासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण, अनिकेत पटवर्धन, शहराध्यक्ष दादा ढेकणे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वर्षाताई ढेकणे, भाजप पदाधिकारी विक्रम जैन, शहर सरचिटणीस व नगरसेवक संदीप सुर्वे, जिल्हा उपाध्यक्ष राजू भाटलेकर यांच्यासह प्रभाग क्र. ७ मधील स्थानिक दानशूर व्यक्तींनी आर्थिक व मोलाचे योगदान दिले.
या उपक्रमास शहराध्यक्ष दादा ढेकणे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा वर्षाताई ढेकणे, शहर सरचिटणीस निलेश आखाडे, सरचिटणीस संदीप सुर्वे, विक्रम जैन, शहराध्यक्षा सौ. भक्ती दळी, शैलेश बेर्डे, सौ. सोनाली केसरकर, सौ. निधी आखाडे, सौ. प्रज्ञा टाकळे, अजिंक्य केसरकर, जितेंद्र जाधव, तेजस पवार, पूजा पवार, नितीन गांगण, नरेंद्र रानडे, सचिन गांधी, राजेंद्र फाळके यांसह भाजपचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शहराध्यक्ष दादा ढेकणे यांच्या नेतृत्वात शहरात रक्तदान शिबिर, फळ वाटप आणि प्रार्थना असे विविध उपक्रम सुरू असतानाच, निलेश आखाडे यांच्या या उपक्रमाने “शिक्षण हेच खरे दान” हा संदेश देत उपस्थितांची दाद मिळवली.












