कर्दे येथे मुंबई – दोडवली एस टी.पलटली; चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात

सुदैवाने जीवितहानी टळली

गुहागर प्रतिनिधी

मुंबई-दोडवली एस.टी. बसचा गुहागर तालुक्यातील कर्दे गावात भीषण अपघात झाला आहे.गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
दरम्यान सुदैवाने या मोठ्या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, अपघात घडला त्या वेळी या एसटी बसमध्ये एकही प्रवासी नव्हता.गाडीमध्ये फक्त चालक आणि वाहक हे दोघेच उपस्थित होते. अपघातामध्ये या दोघांनाही किरकोळ दुखापत झाली असून, त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.