लांजा तालुका सह. कुक्कुट व्याव. संस्थेकडून निवासी नायब तहसीलदार अनिल गोसावी यांचा सत्कार

लांजा (प्रतिनिधी): स्व. स्वातंत्र्य सेनानी शिवाजीराव सावंत लांजा तालुका सहकारी कुक्कुट व्यावसायिक संस्थेच्या वतीने लांजा निवासी नायब तहसीलदार अनिल गोसावी यांचा नुकताच शुभेच्छापर सत्कार करण्यात आला.
सन २०२५-२६ या महसूली वर्षात शासनाच्या धोरणे व उद्दिष्टांनुसार उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल लांजा तहसील कार्यालयाचे निवासी नायब तहसीलदार अनिल गोसावी यांचा रायगड येथे सन्मान करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर . स्वातंत्र्य सेनानी शिवाजीराव सावंत लांजा तालुका सहकारी कुक्कुट व्यावसायिक संस्थेचे अध्यक्ष विवेक सावंत, सदस्य चंद्रकांत शिंदे व अन्य यांनी निवासी नायब तहसीलदार अनिल गोसावी यांची भेट घेतली व शाल, सन्मान चिन्ह व वटवृक्षाचे रोप देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
अनिल गोसावी यांच्यासारखे अधिकारी गोरगरीब जनतेला न्याय देण्याचे काम करत आहेत. त्यांचे हे काम खरोखरच कौतुकास्पद असल्याचे सांगून अध्यक्ष विवेक सावंत व पदाधिकारी यांनी
समाधान व्यक्त करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या