शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्याचे उद्या सावंतवाडीत आयोजन 

आमदार निलेश राणे व दीपक केसरकर यांची प्रमुख उपस्थिती

सावंतवाडी । प्रतिनिधी :शिवसेना जिल्हाप्रमुख तथा सावंतवाडी नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या, बुधवार दिनांक १९ रोजी सकाळी ठीक १०:३० वाजता सावंतवाडी शहरातील गोविंद चित्रमंदिर येथे भव्य वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यास सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री. दीपकभाई केसरकर तसेच कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री. निलेश राणे साहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्यास शिवसेना पक्षाच्या महिला जिल्हाप्रमुख, युवा सेना जिल्हाप्रमुख, सर्व तालुकाप्रमुख, उपतालुकाप्रमुख, शहरप्रमुख, उपशहरप्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख तसेच सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, सरपंच, उपसरपंच आणि शिवसेना पक्षातील सर्व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. त्याचप्रमाणे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील सर्व नागरिकांनी देखील आवर्जून उपस्थित राहून जिल्हाप्रमुख श्री. संजू परब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्यात, असे हार्दिक आवाहन सावंतवाडी शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.