शिक्षणप्रेमी जयवंत मालणकर यांचा स्तुत्य उपक्रम
शिरगाव (प्रतिनिधी) : जि. प. प्राथमिक शाळा व पंचक्रोशी माध्यमिक विद्यामंदिर, गवाणे येथील विद्यार्थ्यांना जि. प. प्राथमिक शाळेचे माजी विद्यार्थी व शिक्षणप्रेमी जयवंत मालणकर यांच्या वतीने शिष्यवृत्ती सराव संच, कंपास बॉक्स, वह्या, पेन्सिल आदी शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा समिती अध्यक्ष संतोष राणे होते. पंचक्रोशी माध्यमिक विद्यामंदिराचे मुख्याध्यापक आनंद रुणकर तसेच प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक संतोष राणे यांनी पुष्पगुच्छ देऊन जयवंत मालणकर यांचे आभार मानले.
यावेळी बारटक्के सर, सदगुरु तळेकर सर, शिक्षकेतर कर्मचारी, विजय वाडेकर, मनोहर गोरुले, दिलीप वाडेकर यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी जयवंत मालणकर यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन गावातच उपलब्ध असलेल्या व्यवसायाच्या संधींचे सोने करावे, तसेच “शिका, वाचा, कमवा आणि देशाची सेवा करा” हा संदेश दिला.













