जीवन शिक्षण शाळा गुहागर नं. १ येथे शिक्षक दिनानिमित्त गुणवंत शिक्षकांचा सन्मान सोहळा

गुहागर प्रतिनिधी:
जीवन शिक्षण शाळा गुहागर नंबर एक येथे भारताचे माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी रूम टू रीड तालुका समन्वयक राम टेके, गुहागर केंद्राच्या केंद्रप्रमुख डॉ मनोज पाटील, अपग्रेड मुख्याध्यापक ईश्वर वसावे, मृणाल झगडे ,संजय आवटे, राजू सुर्वे ,अमोल धुमाळ ईश्वर हलगरे गणेशकर मॅडम जगदाळे मॅडम, ढोणे सर ,सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते . ज्ञानदानाच्या पवित्र क्षेत्रांमध्ये इमाने इतबारे सेवा करून गुणवत्ता क्षेत्राला गवसणी घालणाऱ्या गुहागर नंबर एक शाळेतील सर्व शिक्षकांचा , मुख्याध्यापक ईश्वर वसावे सर, ज्येष्ठ शिक्षिका मृणाल झगडे मॅडम, जेष्ठ शिक्षक श्री संजय आवटे सर , असगोली नंबर एक शाळेचे शिक्षक श्री पवार सर ,श्री राजू सुर्वे सर ,अमोल धुमाळ सर श्री ईश्वर हलगरे सर, जगदाळे मॅडम, गणेशकर मॅडम, ढोणे सर ,केंद्रप्रमुख डॉ मनोज पाटील सर ,रूम टू रेड तालुका समन्वयक श्रीराम टेके यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. त्यावेळी बोलताना मुख्याध्यापक श्री ईश्वर वसावे सर म्हणाले की राष्ट्राच्या उभारणीमध्ये शिक्षकांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे ,म्हणूनच त्यांना राष्ट्राचे शिल्पकार संबोधले जाते. जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक हे पाठ्यपुस्तकाच्या बाहेर जाऊन विद्यार्थ्यांना विविध अध्ययन अनुभव देत असतात, त्यासाठी विविध कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करतात व शाळेच्या सर्वांगीण गुणवत्ता विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. म्हणूनच अशा गुणवंत शिक्षकांचा येथे सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मुख्याध्यापक वसावे सर व केंद्रप्रमुख डावा मनोज पाटील सर यांनी केंद्रातील सर्व शिक्षकांना शिक्षक दिनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पदवीधर शिक्षक श्री राजू सुर्वे यांनी केले.