गुहागर प्रतिनिधी:
सेवा संकल्प अभियान अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुहागर उर्दू येथे स्वच्छ व सुंदर शाळा हीच आपली सेवा या विषयाअंतर्गत चित्रकला स्पर्धा मुख्याध्यापिका बागवान मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. त्यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी चित्रकला स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवून स्वच्छ व सुंदर शाळेबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. ही आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा माऊली जसा बाळा या उक्ती प्रमाणे चिमुकल्या विद्यार्थ्यांना ही शाळा आवडत असून आर टी इ एक गाभ्यानुसार विद्यार्थ्यांनी आवडीच्या क्षेत्रामध्ये उत्तुंग झेप घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आलेली आहे.सेवा संकल्प अभियानांतर्गत बाल चिमुकल्या विद्यार्थ्यांना चित्रकला स्पर्धेतून आपली कला दाखविण्याची संधी प्राप्त झाली. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर अनोखा आनंद दिसून येत होता. शाळेने आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या स्वप्नातील शाळेचे सुरेख चित्र रेखाटले. मुख्याध्यापिका बागवान मॅडम त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मार्गदर्शन केले. स्पर्धेमध्ये सुयश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचे गुहागरचे केंद्रप्रमुख डॉ मनोज पाटील व शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे .सेवा संकल्प अभियानाचे अंमलबजावणीसाठी गुहागर केंद्रामध्ये विविध शाळांमध्ये सुयोग्य रीतीने नियोजन करण्यात आले आहे.












