चिपळूण (प्रतिनिधी) : डी.बी.जे. महाविद्यालय (स्वायत्त), चिपळूण येथील प्लेसमेंट सेल आणि युनिटेक कॉम्प्युटर एज्युकेशन सेंटर, चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत ए.आय. तज्ज्ञ श्री. प्रशांत झा आणि आशिष गडपायले यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव बापट आणि युनिटेक कॉम्प्युटर एज्युकेशन सेंटरचे श्री. झहूर बोट उपस्थित होते. कार्यशाळेचे आयोजन तीन सत्रांमध्ये करण्यात आले. सकाळच्या सत्रात वरिष्ठ महाविद्यालयातील पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना तसेच प्राध्यापकांना ChatGPT, Gemini, Claude, LLM, Prompt Engineering, AI Automation, Google AI Studio, Gemma 2 आणि Ollama यांसारख्या आधुनिक ए.आय. तंत्रज्ञानांची माहिती देण्यात आली. दुपारच्या सत्रात कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना Python Programming, Data Structures and Algorithms, MS Power BI, DeepSeek AI, Perplexity आणि AI Glasses यांसारख्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. संध्याकाळच्या सत्रात महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी Prompt Engineering, AI Agents, DeepSeek, Perplexity, Claude, Gemma 4, Brisk PPT, Google Scholar, MagicSchool.ai आणि Quizzes.com यांसारख्या साधनांची माहिती देण्यात आली. या साधनांचा अध्यापन, संशोधन, सादरीकरण आणि प्रशासकीय कामकाजात कसा उपयोग करता येतो, याचे मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यशाळेला वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध सत्रांचे सूत्रसंचालन प्रा. उदय बामणे, प्रा. सुरेश नलावडे आणि प्रा. के. एस. सावरे यांनी केले. आभार प्रा. सुरेश नलावडे आणि प्रा. एम. एस. माने यांनी मानले. या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाची माहिती मिळून त्याच्या शैक्षणिक व व्यावहारिक उपयोगांविषयी जागरूकता निर्माण झाली.












