वेंगुर्ले येथे सुरू असलेल्या जिल्हास्तरीय विज्ञान नाट्योत्सव २०२६ ला आम.राणे यांनी भेट देऊन दिल्या शुभेच्छा..
वेंगुर्ले : दाजी नाईक
विज्ञान नाट्योत्सवासारख्या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व वैज्ञानिक दृष्टिकोनाला व्यासपीठ मिळते. विज्ञानातून विद्यार्थ्यांनी नवनिर्मितीचा ध्यास घ्यावा. आजची मुले ही उद्याच्या समाजाची आणि देशाची ताकद आहेत. त्यांनी नवनवीन प्रयोग, संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून समाजाच्या प्रगतीत योगदान द्यावे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही मोठी क्षमता आहे. त्यांना योग्य संधी आणि मार्गदर्शन मिळाल्यास ते निश्चितच मोठी कामगिरी करू शकतात. या विज्ञान नाट्योत्सवात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा असल्याचे आमदार निलेश राणे यांनी सांगितले.
वेंगुर्ले येथे सुरू असलेल्या जिल्हास्तरीय विज्ञान नाट्योत्सव २०२६ ला आमदार निलेश राणे यांनी भेट देऊन सहभागी विद्यार्थी, शिक्षक तसेच आयोजकांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी मार्गदर्शन करताना आमदार निलेश राणे म्हणाले, की विद्यार्थ्यांसाठी असे उपक्रम खूप महत्त्वाचे आहेत. विद्यार्थ्यांनी त्यातून चांगला बोध घ्यावा असेही त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांच्या सोबत शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, पंचायत समिती सभापती शंकर घारे, उपसभापती सचिन देसाई, जिल्हा परिषद सदस्य संजय गावडे, भाजप पदाधिकारी कमलेश गावडे, वसंत तांडेल, तुषार साळगावकर, गटशिक्षणाधिकारी अजय ढाणे, उपशिक्षणाधिकारी श्री. किंजवडेकर, माध्यमिक विज्ञान मंडळ अध्यक्ष पांडुरंग काकतकर तसेच इतर अधिकारी, कर्मचारी, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी पंचायत समिती सभापती शंकर घारे व उपसभापती सचिन देसाई यांनी शिक्षण मंडळाच्या वतीने पंचायत समितीमार्फत आमदार निलेश राणे यांचे स्वागत केले. विज्ञान नाट्योत्सवात सहभागी विद्यार्थी व शिक्षकांशी संवाद साधत आमदार निलेश राणे यांनी त्यांच्या उपक्रमाचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.













