मंडणगड (प्रतिनिधी) : मंडणगड तहसीलदार यांच्या आस्थापनेवरील चिंचघर, वेसवी, लाटवण, पंदेरी, सावित्री आणि वेळास या सजांमध्ये रिक्त असलेल्या महसूल सेवक (कोतवाल) पदांच्या ६ जागांसाठी सरळसेवा भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी २ ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत अर्ज साद करावयाचे आहेत.
या भरतीसाठी उमेदवार किमान चौथी इयत्ता उत्तीर्ण असणे तसेच मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. २ ऑक्टोबर २०२६ रोजी वय १८ ते ४० वर्षे असावे. उमेदवार मंडणगड तालुक्यातील रहिवासी असणे आवश्यक असून, त्याबाबतचा पुरावा साद करावा लागणार आहे.
१५ नोव्हेंबरला २०२६लेखी परीक्षा
महसूल सेवक पदासाठी १५ नोव्हेंबर २०२६ रोजी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असून एकूण ५० प्रश्न व १०० गुण असतील. चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा केले जाणार नाहीत. सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी, अंकगणित, मराठी भाषा तसेच रत्नागिरी जिल्ह्याची भौगोलिक व ऐतिहासिक माहिती या विषयांचा परीक्षेत समावेश असेल.
अर्ज प्रक्रिया व शुल्क
अर्जाचा कालावधी २ ते १७ ऑक्टोबर २०२६ असून, अर्ज तहसीलदार, मंडणगड कार्यालयात प्रत्यक्ष सादर करावयाचा आहे. अर्ज शुल्क ५० रुपये आहे. परीक्षा शुल्क मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३०० रुपये, तर इतर उमेदवारांसाठी ५०० रुपये निश्चित करण्यात आले आहे. विहित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
भरतीचे वेळापत्रक
प्रक्रिया खालीलप्रमाणे
अर्ज दाखल करण्याची मुदत
२ ते १७ ऑक्टोबर २०२६
अर्ज छाननी
१८ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२६
प्रवेशपत्र उपलब्ध
४ ते १० नोव्हेंबर २०२६
लेखी परीक्षा
१५ नोव्हेंबर २०२६
उत्तरसूची व निकाल घोषणा
१६ नोव्हेंबर २०२६
कागदपत्र पडताळणी
१७ ते २७ नोव्हेंबर २०२६
नियुक्तीपत्र
२८ नोव्हेंबर २०२६
पात्र उमेदवारांनी जाहिरातीतील शैक्षणिक पात्रता, रहिवास, आवश्यक कागदपत्रे, आरक्षण व शुल्कासंबंधी अटींची माहिती घेऊन विहित मुदतीत अर्ज सादर करावेत, असे आवाहन तहसिल कार्यालयाचे वतीने करण्यात आले आहे.












