राजापुरातील तळवडे गावातील शेकडो ग्रामस्थांचा भाजपात जाहीर प्रवेश

भाजपा जिल्हा सरचिटणीस अभिजित गुरव यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश
राजापूर प्रतिनिधी :भविष्यात शत प्रतिशत भाजपाचा नारा देत पक्ष संघटन अधिक भक्कम करण्याचा निर्धार केलेल्या भाजपाने राजापूर तालुक्यात पक्ष प्रवेशांचा धडाका लावला आहे. केंद्र व राज्यातील सरकारच्या माध्यमातुन होणारी कामे आणि भविष्यातील विकासात्मक प्रगती यामुळे तालुक्यात अनेक गाव व वाडीवस्तीवरील लोक भाजपात प्रवेश करत आहेत. नुकताच तालुक्यातील पुर्व भागातील तळवडे गावातील शेकडो ग्रामस्थांनी भाजपात जाहीर प्रवेश केला.
भाजपा जिल्हा सरचिटणीस तथा उपसभापती अभिजित गुरव यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश कार्यक्रम झाला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांचे नेतृत्व व मार्गदर्शनाखाली संपुर्ण राज्यात भाजपा पक्ष संघटन अधिक बळकट होत आहे. राजापूर तालुक्यातही आ. चव्हाण यांनी विशेष लक्ष दिले आहे. त्यामुळे या विविध पक्ष प्रवेशांमुळे तालुक्यात भाजपाची शक्ती वाढत आहे.
तळवडे येथे झालेल्या या पक्षप्रवेश प्रसंगी  मंडल अध्यक्ष एकनाथ मोंडे, मोहन घुमे, काशिनाथ पाटीलसमीर खानविलकर, ओबीसी अध्यक्ष संदीप तेरवणकर, अमर वारेशे आदी मान्यवर उपस्थित होते.
 या प्रवेशकर्त्यांमध्ये रविंद्र हरी किंजळस्कर, प्रमोद रविंद्र पराडकर, पार्थ सागर किंजळस्कर, तेजस रविंद्र किंजळस्कर, मुकेश सुरेश पराडकर, सिध्देश विजय पराडकर, संतोष हरी किंजळस्कर, राजेश दशरथ पराडकर, दिपेश गणपत किंजळस्कर, रोहन दिनेश पराडकर, अक्षय अनिल पराडकर, श्रीजा रितेश चव्हाण, लक्ष्मी अनंत चिले, संकल्पना प्रमोद चव्हाण, सावित्री सिताराम चव्हाण, विजया विजय पराडकर, प्रकाश रविंद्र पराडकर, सिताराम तुकाराम चव्हाण, आवेश वासुदेव गुरव, साक्षी काशिराम चव्हाण, सागर सदाशिव किंजळस्कर, दत्ताराम बाळकृष्ण किंजळस्कर, महेश हरी किंजळस्कर, प्रमोद तुकाराम चव्हाण, अजय अनंत किंजळस्कर, राकेश विठोबा गुरव, अनंत बापू चिले, लाभेश दिनेश गुरव, विजय सिताराम पराडकर, अंकित अनंत किंजळस्कर, प्रथमेश श्रीराम पराडकर, संदिप वामन पराडकर, गणेश काशिराम चव्हाण, सुयश महेंद्र सावर्डे, स्परिता गणेश धुबे, रिलिका रितेश चव्हाण, कांचन कृष्णाकांत बुडकर, श्रावणी गणेश धुबे, अंजली कृष्णाकांत कुडकर, अमर वासुदेव किंजळस्कर, अरुण कृष्णा गुरव, आत्माराम बाळकृष्ण गुरव, कल्पेश अल्पेश संजय राणे, युवराज रविंद्र किंजळस्कर, विराज रविंद्र किंजळस्कर, श्रीकांत प्रमोद चव्हाण, रिमेश काशिराम चव्हाण, अमोल अनंत चिले, गणेश चंद्रकांत धुबे, निलेश रघुनाथ धुबे, सिध्द किंजळस्कर यांचा समावेश आहे.
या सर्व प्रवेशकर्त्यांचे भाजपात स्वागत करताना अभिजित गुरव यांनी गावातील विकास कामांना न्याय दिला जाईल व पक्षात आलेल्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा योग्य सन्मान केला जाईल अशी ग्वाही यावेळी दिली.