पाळये येथे पक्क्या बंधाऱ्याची दुरवस्था; प्रशासनाने दखल घेऊन पाण्याची साठवणूक करण्याची शेतकऱ्यांची मागणी

​दोडामार्ग (सुहास देसाई ):
सिंधुदुर्ग जिल्ह्यात दहा हजार वनराई बांधण्याचे आवाहन जिल्हयाचे पालकमंत्री ना. नितेशजी राणे यांनी केल्यावर पाच हजार बंधारे पुर्ण झाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे मात्र पूर्वी ग्रामीण भागात लाखो रुपये खर्चून अनेक पक्के बंधारे घालण्यात आले आहे याकडे सर्वांचेच दुर्लक्ष होत आहे अशा बधारे पाणी साठवणूक केल्यास प्रत्येक गावातील शभर वनराई बधारेचे काम एका बांधऱ्यता पाणी साठवणुकीत होणार आहे याकडे स्थानिक प्रशासन व लघु पाटबंधारे जल संपदा विभागाने लक्ष देवून कार्यवाही करण्याची गरज आहे

दरम्यान दोडामार्ग तालुक्यातील
पाळये गावात रस्त्यालगत बांधण्यात आलेला पक्का बंधारा सध्या प्रशासकीय दुर्लक्षामुळे पडून आहे. पावसाळ्यात या बंधाऱ्यात लाकडे, गाळ आणि कचरा अडकून पडल्याने तसेच पाण्याची अडवणूक न झाल्याने हा बंधारा सध्या पूर्णपणे कोरडा पडला आहे. स्थानिक प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन लाकडी पळ्या घालणे आणि मातीच्या पिशव्यांचा वापर करून पाणी साठवण्याची व्यवस्था करावी, अशी जोरदार मागणी परिसरातील शेतकऱ्यांमधून केली जात आहे.

​शेकडो एकर शेतीला मिळणार संजीवनी
​पाळये येथील या बंधाऱ्यात जर वेळेवर पाण्याचा साठा केला, तर परिसरातील शेकडो एकर जमीन ओलीताखाली येऊ शकते. यामुळे केवळ पारंपरिक भातशेतीच नव्हे, तर बागायती आणि इतर दुबार पिकांसाठी शेतकऱ्यांना मुबलक पाणी उपलब्ध होईल. मात्र, योग्य वेळी उपाययोजना न झाल्यामुळे बंधाऱ्याची लोखंडी रॅक आणि रचना असूनही त्याचा उपयोग शेतीसाठी होऊ शकत नाही.

​जिल्हभरात पक्क्या बंधाऱ्यांची अशीच अवस्था असू शकते यासाठी आढावा घेऊन नियोजन केल्यास पाणी साठवणूक होण्यास मदत होणार आहे त्यातून जमिनीला पाणी उपलब्ध होऊन बारा माही पिके घेण्यासाठी पाणी साठा वाढणार आहे
​केवळ पाळये गावच नव्हे, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी बांधण्यात आलेले पक्के बंधारे अशाच दुरवस्थेत आहेत. कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेले हे बंधारे देखभालीअभावी कोरडे पडले आहेत. स्थानिक प्रशासनाने व संबंधित पाटबंधारे विभागाने याची तत्काळ दखल घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना करावी आणि पाणी अडवून पाण्याची सोय करावी, अशी मागणी ग्रामस्थ व शेतकऱ्यांकडून होत आहे.