वेंगुर्ले येथे रविवारी जिल्हास्तरीय पॉवरलिफ्टिंग व डेडलिफ्ट स्पर्धेचे आयोजन…

नाईक जिम वेंगुर्ले आणि कोकण सिंधु पॉवरलिफ्टिंगचा संयुक्त उपक्रम

वेंगुर्ले : प्रतिनिधी

नाईक जिम वेंगुर्ले आणि कोकण सिंधु पॉवरलिफ्टिंग, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय पॉवरलिफ्टिंग व डेडलिफ्ट स्पर्धा २०२६ चे आयोजन रविवार, २२ नोव्हेंबर रोजी करण्यात आले आहे.

वेंगुर्ले येथील ही स्पर्धा सकाळी ७ वाजता वेंगुर्ले येथील साई मंगल कार्यालय येथे होणार आहे. या स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा सावंतवाडी नगरपरिषदेचे नगरसेवक श्री. संजू परब उपस्थित राहणार आहेत.

तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेनेचे जिल्हा समन्वयक श्री. सचिन वालावलकर, वेंगुर्ले नगरपरिषदेचे माजी नगरसेवक श्री. नागेश ऊर्फ पिंटू गावडे उपस्थित राहणार आहेत.

पॉवरलिफ्टिंग व डेडलिफ्ट या क्रीडा प्रकारांना प्रोत्साहन मिळावे, स्थानिक खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळावी आणि जिल्ह्यातील क्रीडाप्रेमींना या स्पर्धेचा आनंद घेता यावा, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या जिल्हास्तरीय स्पर्धेला सर्व खेळाडू, क्रीडाप्रेमी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धेचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.