न्हावेली । प्रतिनिधी :
तिरोडा येथील श्री माऊली देवीचा बुधवार १५ फेब्रुवारी रोजी साजरा होणार आहे. त्यानिमित्त सकाळी महाअभिषेक , समाराधन , ओटी भरणे , केळी ठेवणे नवस बोलणे व फेडणे दुपारी महाप्रसाद व संध्याकाळी स्थानिकांची भजने रात्री दिप उजळणे फटाक्यांची आतषबाजीत संवाद्य पालखी मिरवणुक आदी कार्यक्रम होणार आहेत तसेच रात्री पार्सेकर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. तरी सर्व भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन तिरोडा ग्रामस्थांनी केले आहे .











