तालुक्यातील सापुचेतळे येथे २९ एप्रिल रोजी गौरव महाराष्ट्राचा कार्यक्रम

लांजा (प्रतिनिधी) तालुक्यातील सापुचेतळे येथील कै.रा.सी.बेर्डे विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय सापुचेतळे च्या वतीने शाळा गृह इमारतीच्या मदती करता गौरव महाराष्ट्राचा या भव्य बहारदार, ऐतिहासिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम दिनांक सोमवार दिनांक २९ एप्रिल रोजी रात्र ९ वाजता सापुचेतळे विद्यालयाच्या प्रांगणात पार पडणार आहे. तरी सापुचेतळे पंचक्रोशी सह तालुका वासियांनी या शाळा इमारत गृह इमारतीच्या मदतीकरिता मदत करून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन लोकमान्य शिक्षण संस्था सापुचेतळे चे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.