सावंतवाडी l प्रतिनिधी :पोलिस वसाहत सिंधुदूर्ग, ओरोस येथे गणपति बाप्पा च्या चरणी सोमवारी ‘ज्ञानवापी’ हा पौराणिक नाट्य प्रयोग संयुक्त दशावताराच्या वतीने सादर करण्यात आला.
सदर नाटका चे कथा संकलन पिकुळे गावचे सुपुत्र, प्रतिथयश वकील ॲड.सोनू गवस यांनी केले. या निमित्त यांचा या नाट्य प्रयोगा दरम्यान सिंधुदूर्ग चे पोलिस अधीक्षक सन्माननीय सौरभ कुमार अग्रवाल साहेब यांच्या शुभ हस्ते शाल, श्रीफळ बाप्पाचा प्रसाद देऊन रंगमंच्या वर सत्कार करण्यात आला . यावेळी उत्कृष्ट दशावतार कलाकार दत्तप्रसाद शेणई अँड पी डी देसाई प्रेमानंद देसाई कुब्रल माजी सरपंच प्रवीण परबणउपस्थित होते.












