खा. नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपा नेते निलेश राणे यांच्या माध्यमातून विकासकामे मंजूर : माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांची माहिती
मालवण | प्रतिनिधी : मालवण शहरातील मेढा बंदरजेटी भागातील विकास कामांचा भूमिपूजन शुभारंभ भाजपा पदाधिकारी व नागरिक यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी सकाळी करण्यात आला.

यात मिनी हायमास्ट बंदर जेटी भाजी मार्केट समोर उभारणे तसेच ग्रामीण रुग्णालय ते मेढा रघुनाथ देसाई शाळा मार्गांवर गटार बांधणे व रघुनाथ देसाई शाळा ते बंदर जेटी मार्गांवर गटार उभारणी या विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. प्रभागातील विकासकामे खासदार नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपा नेते निलेश राणे यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन मधून मंजूर झाली. अशी माहिती माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी दिली आहे.
यावेळी भाजपा तालुका प्रभारी आप्पा लुडबे, शहर अध्यक्ष बाबा मोंडकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, खरेदी विक्री संघ संचालक आबा हडकर, किसान मोर्चा तालुका अध्यक्ष महेश सारंग, प्रमोद करलकर, श्री. पेडणेकर, महिला शहर अध्यक्षा अन्वेषा आचरेकर, युवा मोर्चा शहर अध्यक्ष ललित चव्हाण, मोहन वराडकर, महिमा मयेकर, आप्पा मोरजकर, बाळू तारी, चंदू आचरेकर, संदीप मालंडकर, कमलाकर कोचरेकर, राजा मांजरेकर यांसह अन्य उपस्थित होते.












